राजेश कुमार यांनी मुख्य सचिवपदाची सूत्रे स्वीकारली

राज्याच्या मुख्य सचिवपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी राजेश कुमार यांची नियुक्ती झाली आहे. मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून त्यांनी आज पदभार स्वीकारला. पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मान मिळालेल्या सुजाता सौनिक आज सेवानिवृत्त झाल्या. त्यामुळे राज्य सरकारने त्यांच्या जागी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार यांची नियुक्ती केली आहे. राजेश कुमार हे 1988 च्या तुकडीचे सनदी अधिकारी आहेत. पुढील दोन महिन्यांत म्हणजे ऑगस्ट 2025 मध्ये ते सेवानिवृत्त होणार आहेत. दरम्यान, पुढील आदेश होईपर्यंत महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार राजेश कुमार यांच्याकडे कायम ठेवला आहे.