राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे काम एप्रिलपर्यंत पूर्ण होणार

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा साठ फुटांचा तलवारधारी पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम सुरू झाले आहे. सध्या पुतळ्याच्या उभारणीसाठी अत्यंत मजबूत पाया उभारण्याचे काम वेगात सुरू आहे. एप्रिल महिन्यापर्यंत पुतळा उभारण्याचे काम पूर्ण करण्याची राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची योजना आहे. मागील अनुभव लक्षात घेऊन आता अत्यंत मजबूत आरसीसी चबुतरा आणि पूर्णपणे गंजविरोध पाया उभारण्यात येणार आहे.

राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा उभारण्याच्या कामाचा राज्याच्या सार्वजनिक विभागाच्या वतीने सध्या वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. सध्या पुतळ्याचा पाया उभारण्यात येत असून दिल्लीमधील कार्यशाळेत पुतळ्याच्या कास्टिंगचे काम सुरू आहे. या प्रकल्पाच्या कार्यारंभाचे आदेश जारी केल्यापासून सहा महिन्यांत पुतळा उभा राहील. त्यानुसार एप्रिल महिन्यापर्यंत काम होईल असे सांगण्यात आले.

नवीन पुतळ्याची उभारणी

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. सध्या राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा उभारण्याचे काम सुरू झाले आहे.

पुतळ्याची वैशिष्टय़े

z छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा तलवारधारी पुतळा 60 फूट उंचीची असेल

z पुतळ्यासाठी सी 90300 ब्राँझ धातूचा उपयोग, तांबे-88 टक्के, टिन 8 टक्के, झिंक- 4 टक्के

z पुतळा संपूर्णपणे गंजरोधक

z तीन मीटर उंचीचा आरसीसी चबुतरा गंजरोधक,

z पुतळ्याचे आयुष्य 100 वर्षे कंत्राटदारामार्फत

दहा वर्षे देखभाल-दुरुस्ती

z 11 ऑक्टोबर 2024 रोजी मे. राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रा. लिमिटेडला कार्यारंभ आदेश जारी

z राजकोट किल्ल्यावर उभारण्यात येणाऱ्या नवीन पुतळ्याचे काम सहा महिन्यांत केले जाणार आहे.

z पुतळ्यासाठी 31.75 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.