ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही, हा फक्त ट्रेलर

‘ऑपरेशन सिंदूर’ अजून संपलेले नाही, हा फक्त एक ट्रेलर आहे. वेळ आल्यावर आम्ही जगाला संपूर्ण सिनेमा दाखवू, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर राजनाथ सिंह यांनी आज पहिल्यांदाच गुजरातमधील भूज हवाई दल तळाला भेट दिली. यावेळी त्यांनी जवानांशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढवले.

सध्याच्या युद्धबंदीत आम्ही पाकिस्तानला त्याच्या वर्तनाच्या आधारावर प्रोबेशनवर घेतले आहे. जर त्यांच्या वर्तनात काही अडथळा आला तर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही संरक्षण मंत्र्यांनी दिला. ब्राह्मोस क्षेपणास्त्राची ताकद पाकिस्तानने स्वीकारली आहे. दिवसा तारे दिसणे अशी म्हण आहे. रात्रीच्या अंधारात ब्राह्मोसने पाकिस्तानला दिवसाचे तारे दाखवले, असा टोलाही संरक्षण मंत्र्यांनी लगावला, दरम्यान, 15 मे रोजी राजनाथ सिंह यांनी जम्मू-कश्मीरमधील श्रीनगर एअरबेसला भेट दिली. यावेळी त्यांनी सैनिकांना भेटून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.