
रत्नागिरी-नागपूर महामार्गातील नागपूर ते कोल्हापूरपर्यंत शक्तिपीठ महामार्गास समांतर मार्ग असताना शक्तिपीठ महामार्गाचा अट्टाहास कशासाठी? तर 50 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करता यावा यासाठी या महार्गाचा अट्टहास आहे, असा गंभीर आरोप माजी राजू शेट्टी यांनी आज केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनासाठी गेल्या आठवडय़ाभरापासून राज्यातील अनेक ठिकाणांहून लोक पह्न करून भेटण्यास येत आहेत. दोन वर्षांपासून याबाबत खालील अनेक गोष्टींबद्दल आरोप केलेले आहेत. या आरोपाबाबत कोणताही खुलासा मुख्यमंत्र्यांनी केलेला नाही. याउलट अनेक वेळा सारवासारवच केलेली आहे.
विकासाला आमचा विरोधच नाही. मात्र 50 हजार कोटींचा घपला पाडण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या अस्तिवात असलेल्या रत्नागिरी–नागपूर महामार्गाला समांतर शक्तीपीठ महामार्ग करण्याचा आग्रह कशासाठी करत आहेत?
श्वेतपत्रिका काढा
मुख्यमंत्री जर स्वतःला मिस्टर क्लीन समजत असतील तर समृद्धी महामार्गाच्या झालेल्या जमाखर्चाची श्वेतपत्रिका जनतेसमोर सादर करावी, असे आवाहनही केले आहे.




























































