
ज्येष्ठ अभिनेता, निर्माता-दिग्दर्शक राकेश रोशन यांच्यावर 16 जुलै रोजी मुंबईतील खासगी रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यानंतर त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. इर्मजन्सीमध्ये अँजिओप्लास्टी का करावी लागली हे राकेश रोशन यांनी रुग्णालयातील फोटो शेअर करून सांगितले. हा आठवडा माझ्यासाठी खरोखरच डोळे उघडणारा ठरला, असे ते म्हणाले.