
लडाखमधील हान्ले आकाश हे नेहमीच गडद निळ्या रंगात बुडालेले असते. या ठिकाणी दूरदूरपर्यंत केवळ तारे आणि आकाशगंगेची चमक असते. परंतु 19 आणि 20 जानेवारीच्या रात्री काहीतरी अनपेक्षित घडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सामान्य व्यक्तींसह वैज्ञानिकांनाही चक्रावून सोडले आहे. हान्लेच्या आकाशात अचानक लालसर म्हणजे रक्तासारख्या लाल रंगाचा प्रकाश झळकला. अनेकांना हे नॉर्दन लाइट्स वाटले. परंतु हा प्रकार काही तरी नवीन होता. या सुंदर दृश्यामागे नेमके कोणते संकट दडले आहे, अशी भीती आता सोशल मीडियावर यूजर्संकडून व्यक्त केली जात आहे.
खरं म्हणजे ध्रुवीय परिसरात दिसणारे दृश्य साधारणपणे हे हिरव्या रंगाचे असते. परंतु लडाखमध्ये दिसलेले हे दृश्य एकदम लाल रंगाचे होते. याचे कारण म्हणजे उंचीवर उपलब्ध असलेले ऑक्सिजन एटम्स होय. जे 300 किलोमीटरहून जास्त वर सोलर कणांनी उत्तेजित होऊन लाल प्रकाश सोडतो. इस्रोच्या माहितीनुसार, जसे जसे सूर्य आपल्या सोलरकडे सरकतो. तसे तसे ही घटना वारंवार पाहायला मिळू शकते. हे दृश्य खूपच सुंदर दिसत होते. परंतु तितकेच धोकादायकसुद्धा आहे. जानेवारी 2026 ला ही घटना एस4 श्रेणीच्या सोलर रेडिएशन वादळाची होती.





















































