Ratnagiri News – मुंबई गोवा महामार्गावर केमिकल घेऊन जाणाऱ्या टॅंकरला आग

मुंबई-गोवा महामार्गावर केमिकल वाहून नेणार्‍या टँकरला अचानक आग लागल्याची घटना घडली. राजापूर तालुक्यातील पन्हळे माळवाडी येथे ही घटना घडली. टॅंकरला आग लागल्यानंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच राजापूर नगर परिषदेच्या अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग विझवली.

आगीत टँकरचे मागची चाके आणि अन्य भाग जळून खाक झाला. टँकरला लागलेल्या आगीची माहिती मिळताच राजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव आणि सहकारी पोलीस यांसह सिंधुदुर्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अर्धवट जळलेल्या स्थितीतील टँकर रस्त्यातून बाजूला करण्यात आला असून या मार्गावरील त्या भागातील वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली आहे.