
दापोली आणि मंडणगड तालुक्यातील नऊ गावांच्या समुद्रकिनाऱ्यावर 292 कासवांची घरटी उभारण्यात आली होती. या घरट्यांमध्ये ऑलिव्ह रिडले कासवांची एकूण 30,991 अंडी संरक्षित करण्यात आली. त्यातून 10 मार्च 2026 पर्यत ऑलिव्ह रिडले टर्टल महाकाय कासवांची एकूण 466 पिल्ले समुद्रात झेपावली आहेत. मंडणगड तालुक्यातील वेळास आणि दापोली तालुक्यातील केळशी ते दाभोळपर्यंतच्या समुद्रकिनाऱ्यावर थंडीच्या शेवटी अन् उन्हाळ्यात अजस्त्र ऑलिव्ह रिडले टर्टल या महाकाय समुद्र कासवाची वीण होते. दुर्दैवाने या कासवांची आणि त्यांच्या अंड्यांची हत्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी काही वर्षापूर्वी होत असे. त्यामुळे कांदळवन विभागाने कासव मित्रांच्या मदतीने कासवांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर कासवांची अंडी संरक्षित करण्याचे महत्त्वाचे काम हाती घेतले.





























































