
कोकणातील समुद्र किनारी वसलेल्या 780 किलो मिटरचा समुद्र किनारा लाभला आहे. कोकणातील मुरूड समुद्र किनारा हा पर्यटकांचं आकर्षण ठरत आहे. याच मुरूड किनारी सीआरझेडचे उल्लंघन करून केलेल्या बांधकामविरोधात येथील सामाजिक कार्यकर्ते अजय अभिविलास शिरवणेकर यांनी 17 जुलै 2025 रोजी दापोली तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.
दापोली हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ बनत असून जगाच्या नकाशावर दापोली तालुक्याला एक वेगळे महत्व निर्माण होत आहे. अशा बेकायदा बांधकामावर प्रशासन तात्काळ कारवाई का करीत नाही असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे.
दापोली येथील सामाजिक कार्यकर्ते अजय अभिविलास शिरवणेकर यांनी दापोली तहसीलदार, प्रांताधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ चिपळूण यांना याबाबत लेखी पत्र दिले आहे. यात सीआरझेडचे उल्लंघन करत शासकीय जागेत अनधिकृत बांधकाम करणाऱ्यावर गुन्हे दाखल करावे अन्यथा 17 जुलै 2025 रोजी तहसील कार्यालयात उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.