Ratnagiri News – रत्नदुर्ग किल्ल्यावरून तरुणी दरीत कोसळली, शोधकार्य सुरू

रत्नदुर्ग किल्ल्यावरून एक तरुणी दरीत कोसळल्याची घटना आज दुपारी घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकाकडून तरुणीचा शोध सुरू आहे. या तरुणीची ओळख अद्याप पटू शकली नाही. सनसेट पॉईंट येथील रेलिंगजवळ दुपारी 12 वाजता ही घटना घडली.

सनसेट पॉईंटच्या रेलिंगबाहेर या तरुणीला बसलेली अनेकांनी पाहिले होते. या ठिकाणी जॅकेट, ओढणी आणि चपला सापडल्या आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत तरुणीचा शोध सुरू होता. ही तरुणी कोण आहे? कुठून आली होती? तिचे नाव काय आहे? अशी कोणतीही माहिती अद्याप मिळू शकली नाही.