वास्तुरंग कोकण प्रॉपर्टी महोत्सव आजपासून

रत्नागिरीत क्रेडाईच्या वतीने उद्या, 23 ते 26 जानेवारीदरम्यान शासकीय जलतरण तलाव, साळवी स्टॉप येथे वास्तुरंग कोकण प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वसामान्य माणसाच्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी हा महोत्सव आयोजित केला असून ग्राहकांसाठी अनेक सवलती दिल्या असल्याचे क्रेडाई रत्नागिरीचे अध्यक्ष महेश गुंदेचा यांनी सांगितले. सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू रहाणार आहे.

रत्नागिरीतील नामवंत बिल्डर आणि डेव्हलपर्स यांचे विविध गृह प्रकल्प या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. या प्रदर्शनात वन बीएचके, टू बीएचके फ्लॅट, अलिशान बंगलो, रोहाऊस आणि गुंतवणुकीसाठी एन.ए. प्लॉट्स उपलब्ध होणार आहेत. वास्तुरंग प्रदर्शनामुळे कोकणात घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.