
भाजपच्या नव्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांची निवड 1 जुलै रोजी करण्यात येणार आहे. या पदासाठी कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज पक्षाचे निवडणूक निरीक्षक केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, प्रदेश प्रभारी अरुण सिंह यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. मुंबईत एनआयएमसी, वरळी डोम येथे मंगळवारी होणाऱ्या भाजपच्या महाराष्ट्र राज्य परिषद अधिवेशनात रवींद्र चव्हाण यांच्या निवडीची घोषणा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत.