रिचार्ज प्लानच्या किंमती 15 टक्के वाढणार

टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया लवकरच आपल्या रिचार्ज प्लानच्या किंमती वाढवण्याची तयारी करत आहेत. रिपोर्टनुसार, या किंमती 15 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. त्यामुळे रिचार्ज करणे महागणार आहे. 5 जी नेटवर्कच्या विस्तारासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याने रिचार्ज प्लानच्या किंमती वाढवाव्या लागणार आहेत, असे कंपन्यांनी म्हटले आहे. रिचार्ज प्लानच्या किंमती कधीपर्यंत वाढणार हे अद्याप सांगण्यात आले नसले तरी नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये या किंमती वाढवल्या जाऊ शकतात.