आयबीपीएसमार्फत 5 हजार 208 जागांची भरती

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन अर्थात आयबीपीएसमार्फत तब्बल 5 हजार 208 जागांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण करणारा उमेदवार हा अर्ज भरू शकतो. 1 जुलै 2025 पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून 21 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. पूर्व परीक्षा ऑगस्टमध्ये असून मुख्य परीक्षा सप्टेंबरमध्ये घेतली जाईल. या भरतीची सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईट ibpsreg.ibps.in वर देण्यात आली आहे.