नोकरी! ‘एचएएल’मध्ये 300 पदांसाठी भरती

हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) मध्ये एकूण 300 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांमध्ये इलेक्ट्रिशियन, फिटर, मशीनिस्टसह अन्य पदांचा समावेश आहे. आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना 2 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती apprenticeshipindia.gov.in वर देण्यात आली. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसह अन्य प्रवर्गासाठी आरक्षण राखीव ठेवण्यात आले आहे.