Red Fort Bomb Blast – दहशतवादी डाॅ. शाहीन सईदच्या पतीने केली धक्कादायक माहिती उघड, वाचा त्यांच्या घटस्फोटाचं नेमकं कारण

दिल्लीमध्ये झालेल्या बाॅम्ब स्फोटाच्या पार्श्वभूमीवर, आंतरराज्यीय दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश केल्यानंतर पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. या आठ जणांमध्ये लखनौ येथील एका महिला डॉक्टरचा समावेश आहे. डॉ. शाहीन सईद ही महिला दहशतवाद्यांच्या गटाची प्रमुख आहे. शाहीनचे मुंबईशी संबंध असल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी सांगितले की डॉ. शाहीनचे लग्न महाराष्ट्रातील एका पुरूषाशी झाले होते.

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात अटक केलेल्या डॉ. शाहीन सईदच्या आयुष्याबद्दल अनेक गुपिते उघड झाली आहेत. फरीदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त झाल्यानंतर शाहीनला अटक करण्यात आली. तपासात तिचा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या एका मॉड्यूलशी संबंध असल्याचे आणि ती संघटनेची महिला कमांडर म्हणून सक्रिय असल्याचे उघड झाले.

शाहीनचा माजी पती डॉ. जफर हयातने तिची अनेक गुपिते उघड केली. तो म्हणाला की त्यांचे लग्न २००६ मध्ये झाले होते. लग्नानंतर शाहीन अनेकदा युरोपियन देशांमध्ये स्थायिक होण्याबद्दल बोलत असे आणि माझ्यावर तसे करण्यासाठी दबाव आणत असे. मला देश सोडायचा नव्हता. एके दिवशी, ती कोणत्याही वादाशिवाय आम्हाला सोडून गेली. तेव्हापासून आम्ही संपर्कात नाही.

लखनऊ येथील रहिवासी डॉ. शाहीन, तिचे पहिले पती डॉ. जफर हयात कानपूरमधील सरकारी केपीएम रुग्णालयात नेत्ररोगतज्ज्ञ आहेत. त्यांनी डॉ. शाहीनबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले. त्यांनी सांगितले की, त्यांनी २००३ मध्ये शाहीनशी लग्न केले. ती अभ्यासात खूप हुशार होती. त्यांनी कधीच कल्पना केली नव्हती की ती अशा प्रकारे कट्टरतावादाच्या मार्गावर येईल.