
मणिपूरमध्ये बांधकामासाठी खोदकाम करताना मजुरांना दुसऱ्या जागतिक महायुद्धाशी संबंधित अवशेष सापडले. लांगथबल येथे एका बांधकामाच्या ठिकाणी खोदकाम करताना जमिनीखाली चार फुटापर्यंत विविध प्रकारच्या वस्तू हाती लागल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गंजलेले काही रिकामे डबे, पाण्याच्या बाटल्या, एक ग्रेनेड, फावडे आणि अशा अनेक रोजच्या वापरातील वस्तू सापडल्या.