
रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांच्या सभापतीपदासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात सोडत काढण्यात आली.त्यामध्ये चार पंचायत समित्यांमध्ये महिलाराज पहायला मिळणार आहे.सभापतीपदासाठी इच्छुक असलेल्या काही मंडळींना खुशी तर अपेक्षित आरक्षण न पडल्याने काही मंडळी निराश झाली आहेत.
जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह आणि निवासी जिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत पंचायत समिती सभापती पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली.सर्व चिठ्ठ्या एका बरणीत टाकण्यात आल्या.त्यानंतर शालेय विद्यार्थ्यीनी अनन्या उकीरडे हिने बरणीतून चिठ्या बाहेर काढल्या.निवासी जिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी ती चिठ्ठी वाचून आरक्षण जाहीर केले.सभापती पदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे- मंडणगड- सर्वसाधारण महिला,दापोली-नागरिकांचा मागास प्रवर्ग,खेड- सर्वसाधारण,गुहागर-सर्वसाधारण,चिपळूण-सर्वसाधारण,संगमेश्वर-सर्वसाधारण महिला,रत्नागिरी-सर्वसाधारण,लांजा-सर्वसाधारण महिला आणि राजापूर – नागारिकांचा मागास प्रवर्ग महिला