
अभिनय क्षेत्रात काम केल्यानंतर अनेक कलाकार एका ठराविक काळानंतर वेगवेगळे व्यवसाय सुरू करतात. कुणी हॉटेल चालवतं, तर कुणी चित्रपट निर्मिती करतं, कुणी फॅशन इंडस्ट्रीत पाऊल ठेवतं. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रिमी सेनने देखील चित्रपटसृष्टीतून बाहेर पडल्यानंतर दुबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये आपले नशीब आजमावले. सध्या रिमी ही या मार्केटमधली एक प्रसिद्ध एजंट आहे.
हंगामा, गोलमाल, धूम, फिर हेरा फेरी, जॉनी गद्दार अशा अनेक चित्रपटांमध्ये रिमी सेनने काम केले आहे. ”इथलं रिअल इस्टेट मार्केट अगदी नियमांप्रमाणे चालतं. तुम्हाला फक्त आणि फक्त नियमांप्रमाणे चालते. बिल्डर त्याचं काम करतो आणि रिअल इस्टेट एजन्सी त्यांचं काम करतात. तिथे एक सिस्टम आहे”, असे रिमीने सांगितले.
यावेळी तिने हिंदुस्थान सरकारवर टीका देखील केली, ” दुबईत रिअल इस्टेट व्यवसाय जसा चालतो तसं आपल्या देशात दिसत नाही. सरकार कायम आपली धोरणं बदलत असते. यामुळे लोकांचे जगणे अधिक कठिण होते. हजारो प्रकारचे कर, अनेक किचकट प्रक्रिया, त्यामुळे आपला देश हा रिअल इस्टेट व्यवायासाठी योग्य राहिलेला नाही ”, असे रिमी म्हणाली.



























































