
टीम इंडियाचा माजी कर्णधार व सलामीचा फलंदाज रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावांचा पल्ला गाठला आहे. हा रेकॉर्ड करणारा तो हिंदु्स्थानातील चौथा फलंदाज ठरला आहे. सध्या विशाखापट्टनम येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात रोहितने हा टप्पा गाठला.
आता पर्यंत हिंदुस्थानच्या सचिन तेंडुलकर, विराट कोहली, राहुल द्रविड आणि आता रोहित शर्मा या खेळाडूंनी आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावांचा टप्पा गाठला आहे.
सचिन तेंडुलकर 34357 धावा (664सामने),
विराट कोहली 27910 धावा (555 सामने)
राहुल द्रविड 24208 धावा (509 सामने)
रोहित शर्मा 20000 धावा (504 सामने)




























































