T-20 World Cup 2026 – तू वेडा आहेस का! नाणेफेकीच्या कौलापूर्वी रोहित-सूर्याची भन्नाट जुगलबंदी कॅमेऱ्यात कैद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

T-20 World Cup 2026 ची टीम इंडियाने अगदी दणक्यात सुरुवात केली. शनिवारी (7 फेब्रुवारी 2025) अमेरिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने अमेरिकेचा 29 धावांनी पराभव केला आणि स्पर्धेचा विजयी श्री गणेशा केला. सामना सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि हिटमॅन रोहित शर्मा यांच्यातील एक मजेशीर संवाद सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

टीम इंडिया आणि अमेरिका यांच्यामध्ये सामना सुरू होण्यापूर्वी सूर्यकुमार यादव रोहितला विचारतो की, बॅटींग घेऊ का बॉलिंग? रोहितही मजेशीर अंदाजात त्याला उत्तर देतो की, पागल आहेस का फिल्डींग कर. त्यांचं हे अवघ्या काही सेकंदाचं संभाषण सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतंय. रोहित शर्मा T20 World Cup 2026 चा ब्रँड अँबेसडर आहे. त्यामुळे ट्रॉफी घेऊन मैदानात येण्याचा मान त्याच्याकडे होता. यावेळी त्याने टीम इंडियाच्या खेळाडूंशी गप्पा मारल्या आणि त्यांना वर्ल्ड कपसाठी शुभेच्छा दिल्या. ICC ने रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये रोहितने आपल्या वानखेडे स्टेडियमवरील आठवणींना उजाळा दिला. तसेच ड्रेसिंग रुमच्या बालकणीमध्ये असणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूंशी भावनिक संवाद साधला. यावेळी टीम इंडियाच्या जर्सीत नसल्याची खंत त्याला जाणवल्याचं त्याने बोलून दाखवलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)