टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यामध्ये झालेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने बांगलादेशला चारीमुंड्या चित्त केले. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाचा हा विक्रमी मालिका विजय ठरला आहे. या विजयासह रोहित शर्मा World Test Chmpionship मधील सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. याबाबतीत त्याने विराट कोहलीला सुद्धा मागे टाकले आहे.
टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात 18 सामने खेळले असून 12 सामन्यांमध्ये विजय प्राप्त केला आहे. वर्ल्ड टेस्टे चॅम्पियनशीपच्या इतिहासात हा एक विक्रम असून रोहित शर्मा असा विक्रम करणारा पहिला कर्णधार ठरला आहे. त्याने सर्वात कमी सामन्यांमध्ये कर्णधारपद भुषावत विजय मिळवले आणि सर्वाधिक 66.66 टक्के गुणांची कमाई करत थाटात पहिल्या स्थानावर झेप घेतली. बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका जिंकत त्याने विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. विराट कोहलीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये टीम इंडियाचा कर्णधार असताना 22 कसोटी सामन्यांमधील 14 सामन्यांमध्ये विजच मिळवला होता. त्यामुळे विराटने 63.63 टक्के गुणांची कमाई केली होती. मात्र हा विक्रम आता रोहित शर्माने मोडला आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स, चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स आणि सहाव्या क्रमांकावर टीम पेन यांचा समावेश आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या क्रमवारीत टीम इंडियाने आतापर्यंत 11 सामन्यांपैकी आठ सामने जिंकले आहेत, तर दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला असून एक सामना अनिर्णीत राहीला आहे. त्यामुळे टीम इंडिया 74.24 टक्के गुणांसह पहिल्या स्थानावर विराजमान आहे. तर ऑस्ट्रेलिया 62.50 टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.