
‘लिव्ह इन रिलेशनशीप’ म्हणजे जबाबदारीपासून पळ काढण्याचा प्रकार आहे. अशामुळे समाजाचा पाया असलेली कुटुंब व्यवस्था कमकुवत होते,’ अशी नाराजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली.
कोलकाता येथील कार्यक्रमात ते बोलत होते. ‘लग्न हे शारीरिक समाधानाचे माध्यम नाही. तो समाजाचा भाग आहे. समाजात कसे राहायचे त्याचे शिक्षण कुटुंबात मिळते संस्कृती, परंपरेचे संस्कार पिढ्यान्पिढ्या कुटुंबातून येतात. आपला समाज, देश व परंपरा टिकवण्याचा हा मार्ग आहे एखाद्याला लग्न करायचे नसेल तर हरकत नाही, त्याला संन्यासी होता येऊ शकते. पण तेही करायचे नाही आणि कुटुंबाची जबाबदारीही नको. हे योग्य नाही.’ असे भागवत म्हणाले.


























































