निलंग्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात राडा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
chaos-in-shinde-group-gathering-at-nilanga-internal-conflict

लातूरच्या निलंग्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात आज तुफान राडा झाला. मुंबईतील आमदार आणि संपर्कप्रमुख मंगेश कुडाळकर यांच्या उपस्थितीतच कार्यकर्त्यांचे दोन गट भिडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

निलंगा शहरातील टाऊन हॉल येथे आज दुपारी 4 वाजेच्या सुमारास शिंदे गटाचा पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मंगेश कुडाळकर उपस्थित होते. मात्र, मेळावा सुरू होताच शिंदे गटातील अंतर्गत गटबाजी उफाळून आली.

जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. ‘जिल्हाप्रमुख हटाव’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. यावेळी दोन्ही गट आमनेसामने आल्याने मेळाव्यात मोठा गोंधळ निर्माण झाला. कुडाळकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी संतप्त कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र कार्यकर्त्यांचा संताप शांत होत नव्हता.