
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट अपात्र ठरली आहे. त्यामुळे हिंदुस्थानला फटका बसला आहे. अंतिम फेरीच्या आधीच विनेशला अपात्र ठरवल्याने संपूर्ण देशाने रोष व्यक्त केला आहे. पण विनेश ज्या नियमामुळे अपात्र ठरली तो नियम आहे तरी काय? जाणून घेऊयात….
विनेश पन्नास किलो वजन गटात कुस्ती खेळत होती. पण तिचे वजन 150 ग्रॅम जास्त भरल्याने ती अपात्र ठरली आहे. नियमानुसार खेळाडूंना कुस्तीपूर्वी वजन करणे बंधनकारक आहे. जर कुठल्या खेळाडूचे वजन 50 किलो असेल तर तो 50 किलो वजनाच्या खेळाडूशीच कस्ती खेळू शकतो. या खेळात नियम बनवण्याचा हक्क फक्त युनायटे वर्ल्ड रेसलिंगलाच आहे.
युनायटे वर्ल्ड रेसलिंगलाच्या नियम क्रमांक अकरानुसार सामन्यापूर्वी प्रत्येक खेळाडूचे वजन केले जाते. सामन्याच्या 12 तासांपूर्वी वजनाची माहिती सादर करावी लागते. कुठल्याही खेळाडूचा सामना हा त्याच्या वजन गटातल्या खेळाडूशीच होतो. नियमानुसार जर खेळाडूचे वजन जास्त असेल तर को खेळाडू बाद होतो. इतकंच नाही तर सामन्यापूर्वी वजन न केल्यास खेळाडू अपात्र ठरतात. वजन मोजण्याच्या प्रक्रियेत खेळाडू कितीही वेळा वजन करू शकतात.