
तेलंगणातील महबूबाबाद जिल्ह्यातील मरीपेडा येथे मंगळवारी सकाळी माशांनी भरलेला ट्रक उलटला. त्यामुळे त्यामधील मासे रस्त्यावर पडले. ते नेण्यासाठी परिसरातील नागरिकांची झुंबड उडाली होती. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे तेथील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
अपघात घडल्यानंतर तेथे लोकांची प्रचंड गर्दी झाली. मासे रस्त्यावर विखुरल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी शक्य तितके मासे गोळा करत होते. मासे घेण्यासाठी परिसरात प्रचंड गर्दी वाढली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. याबाबतची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर त्यांनी हस्तक्षेप केला. काही वेळातच रस्त्यावरील मासे हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. या घटनेचा व्हि़डीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
A mini lorry carrying live fish overturned near Maripeda in #Mahabubabad district on Tuesday morning, causing chaos as fish scattered across the road. Locals quickly gathered to seize the fish, creating a frenzied scene. #Telangana #FishLoot #RoadSafety pic.twitter.com/mgE0TUYpvt
— Glint Insights Media (@GlintInsights) September 24, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. मात्र यामध्ये छोट्या ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. पोलीस या अपघाताबाबत कसून चौकशी करत आहेत. भरधाव वेगात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, त्यामुळे ट्रक उलटल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.