
युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धामुळे रशियाला तब्बल 1 कोटी मजुरांची आवश्यकता भासली आहे. रशियात वेगवेगळ्या क्षेत्रांत मजुरांची कमतरता भासत आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन डिसेंबर महिन्यात हिंदुस्थान दौऱयावर आले होते. त्यावेळी हिंदुस्थानी वर्कर्सवरून तात्पुरत्या स्वरूपाच्या लेबर मायग्रेशनवर चर्चा झाली होती. एका करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱया झाल्या होत्या. या करारांतर्गत रशियात हिंदुस्थानींना मिळणाऱया वर्क परमिटची संख्या वाढवली होती.



























































