
शनिवारी रात्री रशियाने 273 ड्रोन डागत युक्रेनवर हल्ला केला. युक्रेनियन हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, तीन वर्षांच्या युद्धात रशियाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला होता. या हल्ल्यात 28 वर्षीय युक्रेनियन महिलेचा मृत्यू झाला, तर एका मुलासह तीन जण जखमी झाले.
युक्रेनियन संसदेचे अध्यक्ष रुस्लान स्टेफनचुक यांनी सांगितलं की, हल्ल्यामुळे 9 तास हवाई सायरन वाजत राहिले. या हल्ल्यात निवासी इमारतींचे नुकसान झाल्याचे रुस्लान म्हणाले. तसेच अनेक गॅरेज जळून खाक झाले आहेत.
रशिया आणि युक्रेनमधील चर्चा दोन तासही चालली नाही
दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी पहिली चर्चा 16 मे रोजी तुर्कीतील इस्तंबूल येथे झाली. या बैठकीला दोन्ही देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तुर्कीयेने या बैठकीचे मध्यस्थी केली. ही चर्चा फक्त 90 मिनिटे चालली. युद्ध थांबवण्याबाबत दोन्ही देशांमध्ये कोणताही करार झाला नाही.