मोठी बातमी! युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना रशियाचे चर्चेसाठी पाचारण; शांतता कराराच्या हालचालींना वेग

Russia Invites Ukraine's Zelensky to Moscow for Peace Talks Russia-Ukraine War Update

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू असतानाच, रशियाने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांना शांतता चर्चेसाठी मॉस्कोला येण्याचे पुन्हा एकदा निमंत्रण दिले आहे. सुमारे चार वर्षांपासून सुरू असलेले हे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेतला असून, त्या पार्श्वभूमीवर रशियाचे हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

गेल्या आठवड्यात अबुधाबी येथे अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या चर्चेमुळे शांतता कराराच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. मात्र, रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांच्या अटींमध्ये अद्याप मोठी तफावत आहे. रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी माहिती दिली की, झेलेन्स्की यांना दिलेल्या निमंत्रणावर युक्रेनकडून अद्याप कोणतेही अधिकृत उत्तर मिळालेले नाही.

रशियाने स्पष्ट केले आहे की, जर झेलेन्स्की चर्चेसाठी मॉस्कोला आले, तर त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी रशियाची असेल. गेल्या वर्षी झेलेन्स्की यांनी असेच एक निमंत्रण फेटाळले होते आणि रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनीच कीव्हला यावे, असे सुचवले होते.

शांतता करारात काही मुख्य अडथळे आहेत जसे की रशियाला युक्रेनच्या अशा काही भागांवर ताबा हवा आहे जो सध्या रशियन सैन्याच्या पूर्ण नियंत्रणात नाही. युक्रेनने मात्र आपल्या भूमीचा एकही तुकडा देण्यास नकार दिला आहे. झॅपोरिझिया अणुऊर्जा प्रकल्पाचे नियंत्रण कोणाकडे असावे, हा एक मोठा प्रश्न आहे. तसेच युक्रेनला हव्या असलेल्या सुरक्षेच्या हमीबद्दल रशियाने साशंकता व्यक्त केली आहे.

ट्रम्प यांचा पुढाकार दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमधील हे सर्वात मोठे संकट संपवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आग्रही आहेत. ‘चर्चेत सकारात्मक गोष्टी घडत आहेत’, असे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. दरम्यान, रविवारी अबुधाबीमध्ये दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चेची पुढची फेरी होणार आहे.

Russia Invites Ukraine’s Zelensky to Moscow for Peace Talks | Russia-Ukraine War Update

The Kremlin has reiterated its invitation to Ukrainian President Zelensky for peace talks in Moscow. As US-mediated efforts intensify in Abu Dhabi, read the latest updates on the Russia-Ukraine conflict and Trump’s peace deal push.