I am Single By Choice… सई ताम्हणकरच्या स्टेटसने वेधले लक्ष, ब्रेकअपची चर्चा

अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या चर्चेत आली आहे ते तिच्या इंस्टाग्राम स्टेटसमुळे. तिच्या स्टेटसने सर्वांचे लक्ष वेधले आहे.  I am Single By Choice. Not My Choice. But It’s Still A Choice या स्टेटसमुळे तिच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले आहे. तसेच तिने बॉयफ्रेण्ड अनिश यांच्यासोबतचे सर्व फोटो हटवले आहेत. त्यामुळे तिच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

मराठीसह आपल्या अभिनयाने हिंदीतही आपला ठसा उमटविणारी सई ताम्हणकर हिचे अमेय गोसावी याच्याशी लग्न झालं होतं. पण नंतर तिचा घटस्फोट झाला. त्यानंतर सई अनिश जोग याला डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. त्यानंतर दोघांचे एकत्र फोटोही समोर आले. मात्र आता सईने ठेवलेल्या एका स्टेटसमुळे त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचे दिसत असल्याने त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगू लागल्या. 2022 मध्ये दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या, मात्र सईने ठेवलेल्या स्टेटसमुळे दोघांचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

Sai Tamhankar : 'I Love You', सई ताम्हणकरच्या पोस्टनंतर ब्रेकअपच्या चर्चांना दुजोरा, आता बायफ्रेंडचीही पोस्ट चर्चेत

सईने#Trustory म्हणत एक स्टेट शेअर केलं आहे. तसेच सईने तिच्या इंस्टाग्रावरील अनिश जोगसह सर्व फोटो हटविण्यात आले आहेत. त्यामुळे आणखी चर्चांना उधाण आले. तिने I am Single By Choice. Not My Choice. But It’s Still A Choice असे म्हणत #Trustory असे लिहीले आहे.