‘सैयारा’ने तीन दिवसांत कमावले 83 कोटी

अहान पांडे आणि अनित पड्डा यांचा ‘सैयारा’ चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने 83 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी 21 कोटी, दुसऱ्या दिवशी 25 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 37 कोटींचा गल्ला जमवण्यात या चित्रपटाला यश आले आहे. या चित्रपटाचे बजेट 45 कोटी रुपये होते. तरुणाईमध्ये या चित्रपटाची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे.