आपटेची बोटे कापून आणणाऱयाचा सत्कार करणार, सकल मराठा समाजाची घोषणा

जयदीप आपटेचा शोध घेण्यात पोलीस अपयशी ठरलेत की आपटेला पोलिसांनी आणि सरकारने सुरक्षित स्थळी लपवून ठेवलेय, असा प्रश्न सकल मराठा समाजाने विचारला.

राजकोटवरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे हा फरार झाला असून शिवरायांच्या पुतळय़ाची विटंबना करणाऱयांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे. इतकेच नव्हे तर शिल्पकार आपटेची बोटे छाटून आणणाऱयाचा जाहीर सत्कार करू, अशीही घोषणा केली आहे. शिवपुतळा दुर्घटनेप्रकरणी सकल मराठा समाजाच्या वतीने आज बदलापुरात निषेध आंदोलन करण्यात आले. जयदीप आपटे याने शिवरायांचा कमपुवत पुतळा तयार केल्यामुळेच तो पडला, असा आरोप सकल मराठा समाजाचे अविनाश देशमुख यांनी केला. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदनही देण्यात आले व संबंधितांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली.