
नंदुरबार जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) केलेल्या तपासणीत काही खाद्यतेल नमुने अयोग्य दर्जाचे आढळून आल्याने याप्रकरणी एफडीएचे सहआयुक्त व सहाय्यक आयुक्त अशा दोघांना निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.