युद्धबंदीवरील ट्विटमुळे सलमान खान झाला ट्रोल

बॉलीवूड अभिनेता सलमान खानला युद्धबंदीवरील ट्विटमुळे ट्रोल करण्यात आले. सलमानने ‘एक्स’वर ट्विट करत हिंदुस्थान-पाकिस्तानमधील शस्त्रसंधीबद्दल दिलासा व्यक्त केला. ‘युद्धविरामासाठी देवाचे आभार…’ असे ट्विट सलमानने केले. मात्र हे ट्विट नेटीजन्सला आवडले नाही. त्यांनी सलमानला ट्रोल करत टीका केली. अनेकांनी तर त्याच्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली. ट्रोलिंगनंतर सलमानने काही वेळातच ट्विट डिलीट केले. ट्विट डिलीट का केले, असा जाब अनेकांनी त्याला विचारायला सुरुवात केली.

सलमान खान गेल्या काही दिवसांपासून ‘एक्स’वर फारसा सक्रिय नाही. त्याने 23 एप्रिल रोजी पोस्ट शेअर केली होती. ‘पृथ्वीवरील स्वर्ग असलेला कश्मीर नरकात बदलत आहे. निष्पाप लोकांना लक्ष्य केले जात आहे, त्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत. एका निरपराध व्यक्तीलाही मारणे म्हणजे संपूर्ण विश्वाला मारण्यासारखे आहे,’ असे त्याने म्हटले होते.