भाजप हा राजकीय पक्ष नव्हे, गँग; अखिलेश यादव यांचा हल्ला

‘‘भारतीय जनता पक्ष हा राजकीय पक्ष नसून एक गँग आहे,’’ असा हल्ला समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी आज केला. कानपूरमधील एक वकील अखिलेश दुबे याच्यावर झालेल्या आरोपांच्या संदर्भात ते बोलत होते. दुबे हा भाजपचा खासमखास माणूस आहे. त्याच्यावर खंडणीचे रॅकेट चालवणे, उद्योगपतींना ब्लॅकमेल करणे असे गुन्हे आहेत. तरीही त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही, असे अखिलेश म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या घरी तोडपाणी

कानपूरमध्ये खून, बलात्कार, खंडणी, खोट्या चकमकी, बेकायदा जमीन व्यवहार असे अनेक गुन्हे घडत आहेत. त्यांची योग्य चौकशी झाल्यास संपूर्ण सरकारच अडचणीत येईल. आयपीएस अधिकारीही अनेक गुह्यांत सहभागी असून मुख्यमंत्र्यांच्या घरी आणि कार्यालयात तोडपाणी होते, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.