
साउथ लोकप्रिय अभिनेत्री समांथा प्रभू तिच्या चाहत्यांना थ्रिल आणि सस्पेन्सचा पूर्ण डोस देण्यास सज्ज झाली आहे. समांथा प्रभूने नुकतीच चाहत्यांना अॅक्शन आणि ड्रामाने भरलेल्या एका नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे .समांथाचा आगामी तेलुगू चित्रपट “माँ इंती बंगाराम” मधील पहिला लूक निर्मात्यांनी प्रदर्शित केला आहे, पोस्टर पाहून चाहते या चित्रपटासाठी उत्सुक झाले आहेत. समांथाचे पती राज निदिमोरू “मा इंती बंगारम” ची निर्मिती केली आहे. तर नंदिनी रेड्डी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.
View this post on Instagram
समांथाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर चित्रपटाचा पहिला लूक शेअर केला, जो लगेचच सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या लूकमध्ये समांथा साडी नेसून बसमध्ये उभी असल्याचे दिसून येत आहे. तिच्या चेहऱ्यावर संताप दिसत आहे. या पोस्टरमध्ये ती अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. तिच्या लूककडे पाहता चित्रपटातील तिची भूमिका केवळ ग्लॅमरसच नाही तर बोल्ड आणि स्ट्राँग देखील असेल.
चित्रपटातील सामंथाच्या पहिल्या लूकसोबतच तिने चाहत्यांसोबत ट्रेलरची रिलीज डेटही शेअर केली आहे. हा ट्रेलर 9 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता प्रदर्शित होईल.


























































