
संपूर्ण भाजप हा अर्धवट ज्ञानी, भाजपच्या गु़डघ्यातसु्द्धा मेंदू नाही, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. तसेच भाजपने पैश्यांसाठी पाकड्यांसमोर शेपूट घातलं, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदी भारतासारख्या महान देशावर मतं चोरी करून सत्तेवर आलेले पंतप्रधान आहेत. लिबियामध्ये जे गद्दाफी करत होता, किंवा युगांडामध्ये इदी अमिन करत होता, त्यानंतर इराकमध्ये सद्दाम हुसेन, सिरिया, अफगाणिस्ता आणि रशियामध्ये जे पुतीन करत होते, पाकिस्तानमध्ये लष्करशहा ज्या पद्धतीने निवडणूक जिंकत होते, त्याच पद्धतीने नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी निवडणुका जिंकल्या आहेत. त्यात राज्याच्या निवडणुकाही आहेत, आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील किंवा मनसेप्रमुख राज ठाकरे असतील. यांनी महाराष्ट्रात आणि राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्तरावर हा मुद्दा जनतेच्या घराघरात पोहोचवला आहे. महाराष्ट्रातली मतं गेली कुठे हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे असे संजय राऊत म्हणाले.
देवेंद्र फडणवीस हे अर्धज्ञानी आहेत, मुळात संपूर्ण भाजप हा अर्धवट ज्ञानी आहेत. भाजपच्या गु़डघ्यातसु्द्धा मेंदू नाही. त्यांनी मी तयार केलेला ठाकरे चित्रपट पाहिला पाहिजे. त्यांनी त्या काळच्या बाळासाहेबांच्या मुलाखाती वाचल्या पाहिजे. एकवचनी पुस्तक आहे, त्यात बाळासाहेबांनी आपली भुमिका स्पष्ट मांडली आहे. दिलीप वेंगसरकर हे जावेंद मियांदादला घेऊन अचानक मातोश्रीत आले. आणि मियादाद बाळासाहेबांना विनंती करायला आले होते की भारत पाकिस्तान मॅच पुन्हा सुरु करा म्हणून. बाळासाहेबांनी तोंडावर सांगितलं की दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही. जोपर्यंत कश्मीरमध्ये पाकिस्तानचा रक्तपात सुरू आहे, तो थांबत नाही तोपर्यंत मी पाकिस्तासोबत क्रिकेट खेळायला परवानगी देणार नाही. मिस्टर फडणवीस तुमच्या नरेंद्र मोदींसारखं बाळासाहेबांनी शेपूट नाही घातलं. पाकिस्तान, चीन किंवा ट्रम्पसमोर. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मोदीजी काय म्हणाले होते? रक्त आणि पाणी एकत्र चालणार नाही. आणि आता क्रिकेट चालतंय. बाळासाहेब तोंडावर म्हणाले होते चाय पियो और निकल जाओ. घरात पाहूणा म्हणून आलास, हा चहा प्यायचा आणि निघून जायचं. हे तुम्ही दिलीप वेंगसरकरांना विचारू शकता. देवेंद्र फडणवीस हे खरोखर राष्ट्रभक्त आणि हिंदुत्ववादी असतील आणि महाराष्ट्रातल्या ज्या महिलांचं कुंकू पुसलं त्या महिलांचं त्यांनी कदर असेल तर ते अशी विधानं करणार नाहीत. पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यावर तुमचा पाठिंबा आहे की नाही हे सांगा. भाजपने पैश्यांसाठी पाकड्यांसमोर शेपूट घातलं आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली. .
आपापल्या मतदारसंघात बोगस लाडकी बहीण, लाडका भाऊ बनवून त्यांनी पैसे वाटले आणि मतदान विकत घेतलं. हा गुन्हासुद्धा मतचोरीमध्ये जातो. तसेच या महाराष्ट्रात मटण खायला बंदी आहे का? महाराष्ट्राचा मराठा धर्म नष्ट केला आहे कुणी? फडणवीसांना सांगा ते चोरून काय खातात ते आम्हाला माहित आहे. फडणवीस काय शाकाहारी आहेत का? फडणवीस काय खातात हे आम्हाला माहित नाही का? चिकन मटण का महाग झालं? कारण न खाणाऱ्यांनी रांग लावून खायला सुरुवात केली म्हणून असेही संजय राऊत म्हणाले.
अध्यात्मामध्ये काही गुंड प्रवृत्तीचे लोक शिरले आहेत, ही महाराष्ट्राची परंपरा नाही. जो प्रकार बाळासाहेब थोरात यांच्या बाबतीत होत आहे त्याचा धिक्कार करावा तेवढा कमी आहे. त्याचा धिक्कार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना करायला हवा असेही संजय राऊत म्हणाले.
#WATCH | Mumbai: Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut says, “…The issue of vote theft has been in Maharashtra for 8 months; we have been raising questions on this. This issue was raised by Uddhav Thackeray, Raj Thackeray, Sharad Pawar, and Congress. Devendra Fadnavis’ government came… pic.twitter.com/VYrYIi2aIg
— ANI (@ANI) August 24, 2025