
नाशिकच्या प्रभाग 30 मधून भाजपचे अजिंक्य साने यांनी अवघ्या 324 मतांनी शिंदे गटाच्या सागर देशमुख यांचा पराभव केला. या विजयामागे मुस्लिम मते असल्याची कबुली खुद्द मंत्री गिरीष महाजन यांनी दिली आहे. महाजन व आमदार राहुल ढिकले यांच्या संभाषणाचा व्हिडीओ मंगळवारी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून भाजपाच्या हिंदुत्वाचा बुरखाच फाडला आहे.
(आणि हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार)
राहुल ढिकले- साने निवडून आला महंजे अवघड आहे
तुमची कृपागिरीश महाजन: मुसलमानांना मुळे झाला *चिपड्या* बोला साहब आपको पॅनल नही निकाल के दिया तो मुझे जेल मे डाल देना काय महंतो/ अगर मैंने तुमको वोटिंग निकाल के नहीं दिया तो
आमदार बाई भेटू देत नवती pic.twitter.com/0Dp0kzYryw
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 20, 2026
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी ‘आणि हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार’ या शीर्षकाखाली मंगळवारी ‘एक्स’वर मंत्री गिरीष महाजन आणि नाशिक पूर्व मतदारसंघाचे आमदार राहुल ढिकले यांच्या संभाषणाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. नाशिकमध्ये भाजपने महापालिका निवडणूक स्वबळावर लढवून सत्ता मिळवली, यासाठी त्यांनी किती आणि काय-काय खटाटोप केले, डाव रचले याचा पुरावाच खासदार संजय राऊत यांनी देऊन खळबळ उडवून दिली आहे.
प्रभाग 30 (ड) मध्ये अटीतटीच्या लढतीत भाजपचे अजिंक्य विजय साने निवडून आले. तिसऱया स्थानी एमआयएमचा उमेदवार आहे. याबाबत शुक्रवारी भाजप कार्यालयात मंत्री महाजन आणि आमदार ढिकले यांच्या कानगोष्टी सुरू होत्या, यात चिपडय़ा आणि आमदार बाईंचाही उल्लेख झाला आहे, त्याचा हा व्हिडीओ आहे.
महाजन-ढिकले यांच्यात झालेला संवाद
राहुल ढिकले- साने निवडून आले म्हणजे अवघड आहे, तुमची कृपा. गिरीश महाजन- मुसलमानांमुळे झाला. ‘चिपडय़ा’ बोला.. साहब, आपको पॅनल नहीं निकाल के दिया तो मुझे जेल में डाल देना, काय म्हणतो / अगर मैंने तुमको वोटिंग निकाल के नहीं दिया तो.. आमदार बाई भेटू देत नव्हती.


























































