
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हिंदुस्थान पाकिस्तानसोबत अमेरिका व्यापार थांबवणार असे सांगितल्यानंतर दोन्ही देश युद्धबंदीसाठी तयार झाल्याचे वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशाला संबोधित करण्याच्या काही मिनिटे आधीच ट्रम्प यांनी ”अमेरिकेसोबतच्या व्यापारासाठी हिंदुस्थान पाकिस्तानने युद्धबंदी केली” असे वक्तव्य केलं आहे. त्यावरून आता केंद्रातील मोदी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी देखील यावर ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
पापा ने व्यापार बंद करनेकी धमकी देकर वॉर रुकवा दी!
ये ही है असली विश्वगुरू!
बाकी सब नकली!!
@BJP4India
@Dev_Fadnavis
@PawarSpeaks
pic.twitter.com/REQem4HrOL— Sanjay Raut (@rautsanjay61) May 12, 2025
डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो शेअर करत संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी ”पापा ने व्यापार बंद करनेकी धमकी देकर वॉर रुकवा दी! ये ही है असली विश्वगुरू! बाकी सब नकली!!” अशा शब्दात सरकारवर निशाणा साधला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य
हिंदुस्थान पाकिस्तान युद्धबंदीबाबत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी ”अमेरिकेसोबतच्या व्यापारासाठी हिंदुस्थान पाकिस्तानने युद्धबंदी केली” असे वक्तव्य केलं आहे. ”हिंदुस्थान आणि पाकिस्तानला युद्ध थांबवण्यासाठी आम्हीच सांगितले. आम्हाला दोन्ही देशांसोबत व्यापार करायचा आहे. पण जर युद्ध सुरू राहिले तर व्यापार होऊ शकत नाही असे आम्ही दोन्ही देशांना सांगताच त्यांनी युद्ध थांबवले. युद्ध थांबवण्यासाठी इतरही काही कारणं असतील पण व्यापार हे त्यातील महत्त्वाचे कारण आहे’, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.