धनुष्य बाण आणि घड्याळाचा निकाल लागला!!!! सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्यासोबत मिंधे आणि अजित पवारांच्या फोटोवर संजय राऊत यांचा निशाणा

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या सुनावणीवर सर्वोच्च न्यायालयात ‘तारीख पे तारीख’ सुरूच आहे. या सोबतच शरदश्चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या घड्याळ्याच्या चिन्हाचाही अजून काहीच निकाल लागला नाही. कोर्टात हे प्रकरण सुरू असतानाच सरन्यायाधीश मुंबईत आले होते आणि त्यांचे स्वागत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला.

सरन्यायाधीशांसोबत एकनाथ शिंदे, अजित पवार या तिघांचा एकत्र फोटो पाहून, राऊत यांनी धनुष्य बाण आणि घड्याळाचा निकाल लागला असे म्हणले आहे. याचबरोबर न्यायदेवते त्यांना क्षमा करत आणि शेवटी त्यांनी हे राम म्हटले आहे.

सरन्यायाधीश हे एका कार्यक्रमासाठी मुंबईत आले होते. यावेळी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांना गणरायाची मूर्ती देताना फोटो समाजमाध्यमांवर टाकला. हा फोटो रिशेअर करत “धनुष्य बाण आणि घड्याळाचा निकाल लागला!!!! असे म्हणत राऊतांनी टीका केली आहे.