
मनी लॉण्डरिंगच्या गुह्यात खोटी अटक झाल्याचे भासवून ठगाने वृद्धाच्या बँक खात्यावर डल्ला मारल्याची घटना घडली आहे. ठगाने त्याना कारवाईची भीती दाखवून 10 लाख रुपये उकळले. या प्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
सांताक्रूझ येथे राहणारे तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक आहेत. ते त्याच्या मुलासोबत हॉंगकॉंग येथे राहतात. हॉंगकॉंग येथे जास्त थंडी असल्याने ते नुकतेच मुंबईत आले होते. तीन दिवसापूर्वी ते घरी असताना त्याना मोबाईलवर एका नंबरवरून विडिओ कॉल आला. कॉल करणाऱ्याने तो सीबीआय अधिकारी असल्याचे भासवले. मनी लौंड्रीन्ग आणि मानवी तस्करी प्रकरणात सहभाग आढळून आला आहे. तुम्हाला दिल्ली सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे हे कोणाला सांगू नका, पुढील दोन तासात तुमचा मोबाईल बंद होणार आहे अशी त्याने भीती घातली. त्यामुळे तक्रारदार हे घाबरले. त्याचा फायदा ठगाने घेतला. ठगाने तक्रारदार याना 10 लाख रुपये विविध खात्यात ट्रान्स्फर करण्यास सांगितले. कारवाई टाळण्यासाठी त्याने ते पैसे खात्यात ट्रान्स्फर केले. पैसे ट्रान्स्फर केल्यावर फसवणुकीचा प्रकार समोर आला. त्यानंतर त्याने सांताक्रूझ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.