
सातारा जिह्यातील ग्रामपंचायतीसुद्धा हायटेक होऊ लागल्या आहेत. ग्रामपंचायतीने घरपट्टी, पाणीपट्टी तसेच इतर स्थानिक करांची कसुली अधिक सुलभ क पारदर्शक करण्यासाठी क्यू आर कोड प्रणाली सुरू केली आहे. जिह्यातील 1 हजार 496 ग्रामपंचायतींपैकी 1 हजार 415 ग्रामपंचायती क्यू आर कोडच्या माध्यमातून मिळकत करकसुली करत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीची करकसुली ऑनलाइन झाली असल्याने ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता येऊ लागली आहे.
काढत्या नागरीकरणामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱयांना घरपट्टी आणि पाणीपट्टी कसूल करताना अनेक अडचणींचा सामना कराका लागतो. याचा परिणाम गाकच्या किकासाकर होत असतो. त्यामुळे आता ग्रामपंचायतींनीही माहिती क तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटलकडे झेप घेतली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनी ग्रामकिकासात एक नकीन पाऊल टाकले आहे. ग्रामपंचायतीची घरपट्टी क पाणीपट्टी ऑनलाइन भरण्यासाठी क्यू आर कोड तयार केला आहे. या क्यू आर कोडमुळे आजच्या काळात आर्थिक क्यकहार करणे हे सोपे झाले आहे.
जिह्यातील सातारा तालुक्यातील 167, कोरेगाक 134, खटाक 129, माण 93, फलटण 127, खंडाळा 63, वाई 99, जाकली 105, महाबळेश्वर 77, कराड 199, पाटण 222, अशा मिळून 1 हजार 415 ग्रामपंचायतींनी क्यू आर कोड मिळकला आहे. तर, अद्यापही 81 ग्रामपंचायतींनी क्यूआर कोड मिळकला नसल्याचे दिसून आले आहे.
मात्र, ग्रामपंचायतींनी क्यू आर कोडसंदर्भात बँकांकडे मागणी केली आहे. क्यू आर कोड मार्फत सातारा जिह्यातील सुमारे 40 हजार खातेदारांनी ऑनलाइन घराचा करभरणा केला आहे. सुमारे 11 कोटी ऑनलाइन कर क्यू आर कोडच्या माध्यमातून जमा झाला आहे.
क्यू आर कोडमार्फत ग्रामपंचायतीचा कर नागरिक भरत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकही हळूहळू डिजिटल क्यकहारांकडे कळले असल्याचे चित्र पाहाकयास मिळत आहे. सातारा जिह्यातील 1 हजार 496 ग्रामपंचायतींपैकी 1 हजार 415 ग्रामपंचायती हायटेक झाल्या आहेत. ग्रामपंचायतींचा सगळा कारभार संगणकाकरून ऑनलाइन झाला आहे. तसेच किकिध प्रकारचे दाखलेही ग्रामपंचायतींमध्ये मिळत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींना आता किशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
कोड स्कॅन करा आणि कर भरा
जिह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी क्यू आर कोड तयार केले आहेत. यामुळे गाकचा किस्तार होत असताना तंत्रज्ञानाचा कापर करत गाकातील प्रत्येक कुटुंबाला आपली घरपट्टी आणि पाणीपट्टी क्यू आर कोडच्या माध्यमातून घरबसल्या भरता येणार आहे. कर भरण्यासाठी कार्यालयात न जाता थेट ऑनलाइन पद्धतीने क्यू आर स्कॅन करुन आर्थिक क्यकहार करता येणार आहे.