साठे कॉलेजमध्ये तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थिनीची आत्महत्या

विलेपार्ले पूर्व येथील साठे महाविद्यालयातील विज्ञान शाखेत शिकणाऱया विद्यार्थिनीने आज तिसऱया मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. संध्या सुभाष फाटक असे मृत मुलीचे नाव आहे. या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

सुभाष फाटक हे विरार येथे राहतात. संध्या ही त्यांची मुलगी आहे. ती साठे महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या तिसऱया वर्षात शिकत होती. संध्या ही नेहमीप्रमाणे आज सकाळी कॉलेजला जाण्यासाठी घराबाहेर पडली. कॉलेजला आल्यावर तिने तिसऱया मजल्यावरून उडी मारली. त्यात ती गंभीर जखमी झाली. हा प्रकार प्राध्यापकाच्या लक्षात आला. याची माहिती विलेपार्ले पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर काहीच वेळात पोलीस घटनास्थळी आले. जखमी संध्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याची माहिती तिच्या कुटुंबीयांना देण्यात आली.

पालकांनी व्यक्त केला संशय

संध्या ही आत्महत्या करूच शकत नाही. तिला तिसऱया मजल्यावरून कोणी तरी धक्का मारून खाली पाडल्याचा संशय तिच्या पालकांनी व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी तिसऱया मजल्यावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.

मित्रमैत्रिणींची करणार चौकशी

संध्या मानसिक तणावात नव्हतीच. पोलिसांनी तिच्या आईवडिलांचीदेखील विचापूरस केली. तिने आत्महत्या का केली याचा तपास करावा, अशी विनंती तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना केली. त्याच्या तपासणीचे काम पोलीस करत आहेत.