Bus Accident : बस दरीत कोसळून दोघांचा मृत्यू; अपघाताचा LIVE व्हिडीओ होतोय व्हायरल

गुजरातमधल्या डांग जिल्ह्यात सातपुरा घाटात एका लक्झरी बसचा भयंकर अपघात झाला आहे. ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बस चालकाचं नियंत्रण सुटून बस थेट दरीत कोसळली. या भीषण अपघातात दोन लहान मुलांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. दरम्यान या बस अपघाताचा लाईव्ह व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान या लक्झरी बसने प्रवास करत असलेला एक व्यक्ती व्हिडीओ बाहेरील दृश्याचे व्हिडीओ काढत होता. या व्हिडीओमध्ये हा थरारक अपघात कैद झालाय.ट्रकला ओव्हरटेक करत असताना समोरून टेम्पो आला. त्या टेम्पोला वाचवण्याच्या प्रयत्नात बस रस्त्याकडेला असलेला संरक्षक कठडा तोडून दरीत कोसळली असे त्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या बसमधून 70 प्रवासी प्रवास करत होते.