
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत इयत्ता पाचवी ते सातवीमध्ये शिकणाऱया विद्यार्थ्यांना दरमहा 60 रुपयांवरून 250 रुपये आणि इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दरमहा 100 रुपयांवरून 400 रुपये वाढ करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे, अशी घोषणा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विधान परिषदेत केली. शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्याबाबत आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, अरुण लाड, सचिन अहिर यांनी तारांकित प्रश्न विचारला होता.
राज्यातील सर्व चेकपोस्ट बंद करणार
राज्यातील चेकपोस्टवर गैरवर्तन होत असून अनेक ठिकाणी करारातील अटींचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सर्व चेकपोस्ट बंद करण्याबाबत शासन सकारात्मक असून त्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत सांगितले.

























































