
शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात शहापूरहून एसटी बस सेवा सुरू होत्या. पण एसटी महामंडळाने या बस सेवा अचानक बंद केल्या. त्यामुळे तालुक्यातील सारंगपुरी, मुरबीचापाडा, अवकळवाडी, कोठारे, पोकळ्याचीवाडी, जळक्याचेवाडी या भागातून धसईकडे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी खासगी वाहतुकीचा उपयोग करावा लागत आहे. आज या आदिवासी गावातील विद्यार्थ्यांनी आपली शाळा सुटल्यावर धसईहून शहापूरकडे जाणारी बस रोखून धरत बस समोर आंदोलन केले. विद्यार्थ्यांसाठी बस शासनाने न दिल्याने आज मुलांनी धसई या ठिकाणी बस समोर बसून आंदोलन केले.