
गणेशोत्सावासाठी कोकणात जाणाऱया चाकरमान्यांचा प्रवास आणखी सुसह्य होणार आहे. चाकरमान्यांना कमी वेळेत आपल्या गावी पोहोचवण्यासाठी मत्स्य व बंदरे विकास विभागाने समुद्रमार्गे प्रवास उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. ज्यामुळे आता मुंबईतून तीन तासांत रत्नागिरी तर साडेचार तासांत मालवण, विजयदुर्ग गाठता येणार आहे.
मुंबईतील माझगावपासून मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू करण्यात येणार आहे. हायटेक यंत्रणा असलेल्या ‘एम टू एम’ या बोटीमार्फत कोकणात प्रवास करता येणार आहे. ‘एम टू एम’ बोट येत्या 25 मेपासून मुंबईतील भाऊचा धक्का येथे दाखल होणार असल्याचे सांगण्यात येते.