तीस वर्षांनी ’दामिनी’ पुन्हा येतेय…

दूरदर्शन सह्याद्रीवरची पहिली दैनंदिन मालिका म्हणजे ‘दामिनी. या मालिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. पाच वर्षांचा कालावधीत या मालिकेचे 1500 एपिसोड्स प्रसारित झाले. प्रतीक्षा लोणकर, क्षिती जोग या अभिनेत्रींनी या मालिकेत मुख्य व्यक्तिरेखा साकारली. आता तीस वर्षांनी, या मालिकेचा दुसरा सीझन नव्या रूपात, नव्या दिमाखात पुन्हा त्याच वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘दामिनी 2’ मध्ये किरण पावसे ही अभिनेत्री मुख्य व्यक्तिरेखा साकारणार आहे. तिच्यासह ध्रुव दातार हा अभिनेता नायकाच्या भूमिकेत आहे. येत्या 13 ऑक्टोबरपासून ही मालिका सायंकाळी 7.30 वाजता सह्याद्री वाहिनीवर सुरू होणार आहे. ही दामिनी आता नव्या रूपात, नव्या उत्साहात दाखल होणार असली तरी तिची प्रेरणा, ऊर्जा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द तीच आहे.