ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश राऊत यांचे निधन

बेळगाव शिवसेनेचे ज्येष्ठ शिवसैनिक आणि उपशहर प्रमुख प्रकाश राऊत यांचे हृदयविकाराच्या झटक्याने नुकतेच निधन झाले. ते मुंबई वरळी मतदारसंघाचे शिवसैनिक होते. गेली 15 ते 20 वर्षे ते बेळगावात स्थायिक झाले होते. त्यांनी कोरोना काळात युवासेना बेळगावच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयांमध्ये मोफत अन्न वाटप केले होते.