शेअर बाजार कोसळला; 2.79 लाख कोटी स्वाहा

शेअर बाजार गुरुवारी चांगलाच घसरला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 582 अंकांनी घसरून 78,886 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 180 अंकांनी घसरून 24,117 अंकांवर बंद झाला. शेअर बाजारात झालेल्या आजच्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे 2.79 लाख कोटी रुपये बुडाले. बीएसईच्या
मिडपॅप आणि स्मॉल पॅप च्या इंडेक्समध्ये सुद्धा घसरण पाहायला मिळाली. बीएसई मिडपॅप इंडेक्स 0.44 टक्के आणि स्मॉलपॅप इंडेक्स 0.16 टक्के घसरणीसह बंद झाले. सर्वात जास्त घसरण ही मेटल, आयटी, रिअल्टी आणि पंज्युमर डयुरेबल्सच्या शेअर्समध्ये झाली. आज 30 शेअर्सपैकी केवळ 5 शेअर्समध्ये वाढ दिसली.

30 पैकी 25 शेअर्समध्ये मोठी घसरण

गुरुवारी 25 शेअर्समध्ये घसरण झाली. यात एशियने पेंट्सचे शेअर्स सर्वात जास्त 3.56 टक्के घसरले. इन्पहसिस, जेएसडब्ल्यू स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवर ग्रीडच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली.

गुंतवणूकदारांचे 2.79 लाख कोटी बुडाले

शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांना जोरदार फटका बसला. बीएसई लिस्टेड पंपन्यांचे एपूण मार्पेट पॅपिटलायझेशन 445.78 लाख कोटी रुपयांवर आले. बुधवारी ते 448.57 लाख कोटी रुपयांवर होते. याचाच अर्थ आज गुंतवणूकदारांचे 2.79 लाख कोटी रुपये बुडाले.